शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते देविदास आप्पा तांबे यांच्या माध्यमातून रहाटणी परिसरात आप्पा तांबे प्रीमियर लीग या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या आमदार अश्विनीताई लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते करण्यात आले होते.
रहाटणी परिसरातील सर्व सोसायट्यांमध्ये आप्पा तांबे प्रीमियर लीगच्या माध्यमातून या आयोजित क्रिकेट स्पर्धेमध्ये अनेक संघांनी सहभाग घेतला. सध्या इंटरनेट माध्यमातून जग जसे जवळ आले तसेच रहाटणी परिसरातील सोसायटी यांना जवळ आणण्याचे काम आप्पा तांबे प्रीमियरलीच्या माध्यमातून करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी आयोजक देविदास तांबे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले. त्यामध्ये एकाच गावातील, एकाच तालुक्यातील, एकाच जिल्ह्यातील नागरिकांची एकमेकांशी ओळख होणे अपेक्षित होते. यामध्ये गेले सहा महिन्यापासून प्रीमियर लीगसाठी सोसायटी मधील सर्व नागरिक परिश्रम घेत होते. सारख्या अडचणी येत होत्या. त्याबाबत सारखी विचारणा सोसायटी माध्यमातून होत होती. ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सोसायटीमधील नागरिकांनीच ही स्पर्धा हातात घेतली होती, असे देविदास आप्पा तांबे यांनी सांगितले.
स्पर्धेसाठी गोविंदराव तांबे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने रोख पारितोषिक व सन्मानचिन्हे व भाग घेणाऱ्या प्रत्येक संघात सन्मानचिन्ह अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण भाजपचे नेते उद्योजक शंकर शेठ जगताप यांच्या हस्ते विमल गार्डन येथे वितरित करण्यात आले. यामध्ये सर्व विजयी संघांना सन्मानित करण्यात आले. तसेच या निमित्ताने मनोरंजनचा कार्यक्रम व स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
या कार्यक्रमास नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद पाहावयास मिळाला. या स्पर्धेत एकूण 40 संघानी सहभाग घेतला. या संघात सहा महिला संघांचा सहभाग होता. या आप्पा तांबे प्रीमियर लीग स्पर्धेत पुरुष संघापैकी रॉयल एलिगन्स, लाइफ 360 पलटण, साईलीला तर महिला संघात साईलीला, क्रिस्टल पार्क, ज्ञानगंगा या संघांनी विजेतेपद पटकावले. या सर्व विजेत्या संघांना तसेच सहभागी संघांना सन्मानित करत त्यांचे अभिनंदन करण्यात आले. भविष्यकाळातही अशाच क्रीडा स्पर्धा आयोजित करून पिंपरी चिंचवड शहरात क्रीडा प्रेमींना तसेच क्रीडा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याची कार्य करणार असल्याचे देविदास आप्पा तांबे यांनी सांगितले.