शबनम न्यूज ( प्रतिनिधी ) पुणे :
सध्या मुस्लिमांचं रमजान महिना सुरु आहे, या पवित्र रमजान महिन्यात प्रेम , सलोखा अबाधित राहावा तसेच जाती पतीचे राजकारण संपुष्टात यावे तसेच जातीय सलोखा वाढावा अनेक सामाजिक सांधता राजकीय पक्ष यांच्या वतीने उलिं बांधवाना रमजान ईद च्या शुभेच्छा दिल्या जात आहे.यास अनुसरूनच पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्त्या प्रतिभा रघुनाथ जवळकर यांनी कासारवाडी येथील भोरी समाज बांधवाना ईदच्या शुभेच्छा भेटून दिल्या. यावेळी त्यांच्या समवेत भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पासलकर , मौलाना आणि इतर सहकारी उपस्थित होते
या वेळी सौ. प्रतिभा रघुनाथ जवळकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले कि पवित्र रमजान ईद म्हणजे धार्मिक समतेचा व्यापक संदेश देणारा सण आहे. समाजकारण आणि राजकारण या सेवाभावी कार्य पटलावर जात,धर्म,पंथ यांच्या पलीकडे जाऊन सर्वधर्म समभाव ही संकल्पना आपण आत्मसात केली पाहिजे, अशा शब्दांत सौ. प्रतिभा रघुनाथ जवळकर यांनी शुभेच्छा व्यक्त केल्या.