शबनम न्युज | पिंपरी
महापालिकेच्या सर्व क्षेत्रीय कार्यालयांमध्ये आज जनसंवाद सभा संपन्न झाली नागरिक आणि प्रशासन यांच्यामध्ये सुसंवाद राखण्यासाठी तसेच तक्रारींचे निवारण जलदगतीने करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येते. जनसंवाद सभा ही नागरिक आणि महापालिका यांच्यातील समन्वय ठरत असून विविध प्रश्न, सूचना, तक्रारींच्या माध्यमातून महापालिकेची ध्येय धोरणे, निर्णयांमध्ये नागरी सहभाग वाढवण्यासाठी देखील महत्वाची भूमिका बजावत आहे. याअनुषंगाने फ क्षेत्रीय कार्यालयामध्ये क्षेत्रीय अधिकारी सीताराम बहुरे व सहशहर अभियंता मनोज सेठिया आणि ब क्षेत्रीय कार्यालयामध्ये अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप व क्षेत्रीय अधिकारी अमित पंडीत यांच्या उपस्थितीत जनसंवाद सभा संपन्न झाली
Advertisement