शबनम न्युज | चाकण
सव्वा वर्षाच्या मुलाला गरम बादलीच्या पाण्यात बुडवून हत्या करून फरार झालेल्या आरोपीस अटक करण्यात चाकण पोलिसाना यश आले. ही घटना 6 एप्रिल 2023 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. शरद कोळेकर (वय 23, रा.कोयाळी ता. खेड, जि. पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत मुलाच्या आईने आरोपीला लग्न करण्यास नकार दिल्याने आरोपीने तिच्या सव्वा वर्षाच्या मुलाला बाथरूम मध्ये गरम पाण्याच्या बादलीमध्ये बुडविले. या घटनेमध्ये चिमुकला गंभीररीत्या भाजल्याने त्याला ससून हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी नेण्यात आले. मात्र, उपचारा दरम्यान चिमुकल्याचा मृत्यू झाला. चिमुकल्याची हत्या करून आरोपी हा फरार झाला होता. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखा युनिट 3 कडून 24 तासाच्या आत आरोपीला गजाआड करण्यात आले.
चाकण पोलिसांनी पथक तयार करून आरोपीचा शोध सुरू केला. दरम्यान, आरोपी हा बहुल परिसरात येणार असल्याची बाब पोलिसांना कळताच सापळा रचून आरोपी शरद कोळेकर याला पोलिसांनी ताब्यात घेतले. तपासादरम्यान चिमुकल्याचा खून केल्याचे कबुली आरोपीने दिली. शरद कोळेकर याच्या विरोधात भा.द.वि. कलम 302, 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत अधिक तपास चाकण पोलीस करीत आहेत.
सदर कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त मनोज लोहिया, अप्पर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उप आयुक्त जिन्हें, स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे अतिरिक्त कार्यभार) श्रीकांत डिसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक गिरीश चामले, पोलीस अंमलदार यदु, सचिन मोरे, महेश भालचिव, ऋषिकेश भोसुरे, योगेश कोळेकर, सागर जैनक, शशिकांत नांगरे, त्रिनियम बाळसराफ, सुधीर दांगट, समीर काळे, निखिल फापाळे, रामदास मेरगळ, राजकुमार हनमंते, राहुल सूर्यवंशी यांनी केली आहे.