शबनम न्युज | मुंबई
जेष्ठ नेते शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाचे विस्तारित आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
यावेळी बोलताना जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, “आपण सर्वाचे अश्रू आणि भावनाही पाहत आहात. गेली ६० वर्षे कार्यकर्त्याच्या मनात काय, हे बघणारे जादूगर आहात. वय हा तुमच्यासाठी प्रश्न नाही आहे. २००४ साली नागपूरमध्ये तोंडातून रक्त वाहत असताना प्रचार करताना पाहिलं आहे. आताची तब्येत खूप बरी आहे. अशा अवस्थेत तुम्ही पक्ष सावरला. पण, तुमच्यासारखा पुरोगामी माणूस महाराष्ट्रात होणे नाही. आमचं जीवनच तुम्ही आहात. एवढ्या अडचणी असताना कोणाकडं जायचं?,” असं म्हणत जितेंद्र आव्हाड यांना अश्रू अनावर झाले.