शबनम न्युज | पिंपरी चिंचवड
पिंपरी चिंचवड परिसरात जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे युनिट 1 कडून तपास सुरू असतानाच जबरी चोरी, घरफोडी, गहाळ झालेले दागिने, 69 मोबाईल असा 7 लाख 10 हजार लाखांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या युनिट एक कडून हस्तगत करण्यात आला आहे.
याप्रकरणी सोमा दुर्गप्पा चौधरी (वय 19 , रा.नेहरूनगर, पिंपरी) आदित्य सुरेश कोळी (वय 18, रा.नेहरूनगर, पिंपरी) यांच्यासोबत एक विधी संघर्षित बालक यांना अटक करण्यात आली आहे. तपासादरम्यान आरोपींकडून जबरी चोरीच्या गुन्ह्यातील 23 मोबाईल जप्त करून एकूण 8 जबरी चोरी व एक घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. त्यांच्याकडून एकूण 7 लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनायक कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त संजय शिंदे ,अप्पर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त गुन्हे स्वप्ना गोरे, सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे प्रशांत अमृतकर यांच्या मार्गदर्शनाखाली तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर काटकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय तुंगार सायबर गुन्हे, पोलीस उपनिरीक्षक इमरान शेख, पोलिस अंमलदार फारुक मुल्ला, प्रमोद हिरळकर, उमाकांत सरवदे, स्वप्निल महाले, मारुती जयभाई, विशाल भोईर व तांत्रिक विश्लेषक नागेश माळी यांनी केली आहे.