शबनम न्यूज | पुणे
ससून रुग्णालयातून फरार झालेल्या दोन आरोपींपैकी एकाला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. वीरेंद्र सिंह ठाकुर (वय, 40) हा 6 मे रोजी ससून रुग्णालयातून पळून गेला होता, त्याला आज पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकूर याचा ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू असतानाच तो तेथून पळून गेला, आळेफाटा येथील चोरीच्या गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. ठाकूर हा पळून गेला असताच पोलिसांनीही त्याला आज ताब्यात घेतले. ठाकूर याची तब्येत बिघडल्याने त्याला उपचारासाठी ससून हॉस्पिटलच्या वार्ड क्रमांक 9 मध्ये दाखल करण्यात आले होते. आरोपींनी परिस्थितीचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.
Advertisement