शबनम न्युज | मुंबई
“सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. सत्ता संघर्षाच्या निकालांनंतर ते प्रसार माध्यमांशी बोलत होते.
आज महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला. यावेळी उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला नसता, तर महाविकास आघाडी सरकार परत आणता आलं असतं, असेही न्यायालयाने म्हटले. यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
Advertisement
ते म्हणाले, “सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही पूर्ण समाधानी आहोत. जे लोक कालपर्यंत उड्या मारत होते, की आज सरकार जाणार… त्यांच्या सर्व मनसुब्यांवर पाणी फेरलं आहे. त्यांनी केलेल्या चर्चा थोतांड होत्या, हे सुद्धा यातून समोर आलं आहे.” असे फडणवीस म्हणाले.
Advertisement