शबनम न्युज | तळेगाव दाभाडे
पुण्यातील तळेगाव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांच्यावर शुक्रवारी (दि. १२) रोजी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असता, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, किशोर आवारे हे शुक्रवारी तळेगाव दाभाडे नगर परिषदेमध्ये गेले असता, ते इमारतीच्या खाली येत असताना त्यांच्यावर गोळीबार झाला. तसेच कोयत्याने देखील वार करण्यात आले, यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
Advertisement
मावळमधील हे दुसरे हत्याप्रकरण आहे. १ एप्रिल रोजी अशाच प्रकारे शिरगावचे सरपंच प्रवीण गोपाळे यांची हत्या करण्यात आली होती.