शबनम न्युज | हिंजवडी
कंट्रक्शनच्या साइटवरून 52 ॲल्युमिनियमच्या सेंट्रिंग प्लेट चोरल्याप्रकरणी 4 अनोळखी इसमांच्या विरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 11 मे 2023 रोजी पहाटे 4च्या सुमारास माउंटबोर्ड ॲक्सिस, मुळशी रोड, प्रांजली पाटील नगर, बावधन येथे घडली. या प्रकरणी मनोज सावरमल मित्तल (वय 44, रा. बोपोडी पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार चार अनोळखी इसमाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बावधान येथील कंट्रक्शनची साईट वरून एकूण 2 लाख 8 हजार रुपये किमतीच्या 52 ॲल्युमिनियमच्या सेंट्रिंग प्लेट चार अनोळखी इसमांनी चोरून नेल्या. याप्रकरणी फिर्यादी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भा.द.वि. कलम 379 अंतर्गत चार अनोळखी इसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिकता तपास हिंजवडी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक मुदळ करीत आहे.