शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील भारतीय जनता पार्टीचे, पिंपरी चिंचवड उपाध्यक्ष शेखर चिंचवडे यांच्या संकल्पनेतून त्यांच्या प्रभाग क्रमांक 17 मधील नागरिकांसाठी आधार कार्ड सुविधा केंद्र उपलब्ध करून देण्यात आले आहे. या सुविधा केंद्राला नागरिकांच्या वतीने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळताना दिसत आहे. शेखर चिंचवडे यांनी ही विशेष सुविधा मोहीम आधार कार्ड अपडेट साठी राबविली असून, या मोहिमेला नागरिकांच्या वतीने उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
रविवार असून सुद्धा नागरिकांनी सकाळपासूनच या सुविधा केंद्राचा लाभ घेण्यासाठी मोठी गर्दी केलेली दिसते. यावेळी शेखर चिंचवडे यांनी नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या आधार संबंधित छोट्या मोठ्या गोष्टींचा विचार करून तसेच आधार कार्ड मध्ये दुरुस्ती करण्याच्या हेतूचा विचार करून या सुविधा आपण उपलब्ध करून दिल्या असल्याचे यावेळी शेखर अण्णा चिंचवडे यांनी सांगितले.
तसेच या सुविधा केंद्राचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन केले आहे. यावेळी सर्व उपस्थितांचे शेखर चिंचवडे यांनी आभार व्यक्त केले. आपण नेहमीच जनसेवेसाठी सदैव तत्पर आहोत आणि यामुळेच आपण नागरिकांच्या आणि अडचणी सदैव सोबत असतो व त्यांच्या अडीअडचणी सोडविण्यावर भर देत असतो, असे यावेळी शेखर चिंचवडे यांनी सांगितले आहे. या आधार कार्ड अपडेट सुविधा केंद्र आधार कार्डची दुरुस्ती होत असल्याने अनेक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच ही सुविधा जलतीने पूर्वी याबद्दल नागरिकांनी शेखर चिंचवडे यांचेही आभार व्यक्त केले.