शबनम न्युज | पिंपरी
दुचाकी चोरणाऱ्या चोरट्याला पिंपरी चिंचवडच्या गुन्हे शाखा युनिट-4 ने अटक केली आहे. आरोपीकडून 5 लाख दहा हजारांच्या 11 दुचाकी हस्तगत केल्या आहेत. तसेच सात गुन्हे देखील उघडकीस आले आहेत. राहुल दगडू असे आरोपीचे नाव असून, तो सराईत गुनागार असल्याचे समोर आले आहे.
आरोपी राहुल हा पुणे जिल्ह्यासह पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीतून दुचाकी चोरत होता. तो इतर ठिकाणी कमी किमती त्या चोरलेल्या दुचाकी विकत होता. आरोपीने आतापर्यंत अनेक दुचाकी चोरल्या असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. सध्या तरी त्याच्याकडून 11 दुचाकी जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे गुन्हे शाखा युनिट 4 चे पोलीस निरीक्षक बाबर आणि पोलीस निरीक्षक शंकर अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
Advertisement