शबनम न्युज | गोंदिया (वृत्तसंस्था)
गोरेगाव-कोहमारा महामार्गावर भंडगाजवळ कार झाडाला धडकल्याने चालकाचा जागीच मृत्यू झाला. माजी जिल्हा परिषद सदस्य श्रीचंद रोहडा (वय 70) हे आपल्या कारने आज 19 मे रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास गोंदियावरून कोहमाराच्या दिशेने निघाले होते.
गोरेगाव कोहमारा महामार्गावर भरधावकार अनियंत्रित होऊन झाडाला धडकली, यात त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती गोरेगाव पोलिसांना देण्यात आले असून, पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
Advertisement