शबनम न्युज | पुणे
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नगर, नाशिकच्या तुलनेत पुण्यालाच झुकते माप देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेल्या सदस्यांची यादीतून ही बाब समोर आली आहे .
पुणे विद्यापीठाच्या मानव विज्ञान आणि तंत्रज्ञान वाणिज्य व व्यवस्थापन आणि आंतरविद्या शाखीय शाखांमधील 61 अभ्यास मंडळावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र त्यात नगर व नाशिकच्या तुलनेत पुण्याला झुकते माप देण्यात आले आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम कलम 40 (2) अन्वये किमान, दहा वर्षे अध्यापनाचा अनुभव असलेल्या अध्यापकाचे नामनिर्देशन करण्यात येते. एका विषयाच्या अभ्यास मंडळात संबंधित विषयातील विद्यापीठाच्या विभागातील पूर्णवेळ अध्यापकांमधून एक तर विद्यापीठाची सलग्न महाविद्यालय, मान्यताप्राप्त परिसंस्था मधील दोन अध्यापक आणि विभाग प्रमुख नसलेले तीन अध्यापक अशा एकूण सहा जणांचा समावेश असतो. त्यानुसार मानव विज्ञान आणि तंत्रज्ञान वाणिज्य व व्यवस्थापन आणि आंतरविद्या शाखा शाखांमधील 61 अभ्यास मंडळावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात आली आहे .
मानव विज्ञान विद्याशाखेत अभ्यास मंडळाच्या एकूण 120 जागा होत्या. त्यातील 95 जागा भरल्या असून, 35 रिक्त आहेत. यात पुणे शहर व जिल्हा मिळवून 48 तर नगर आणि नाशिकला केवळ 47 जागा दिले आहेत. वाणिज्य विद्याशाखेत 180 जागांपैकी 162 जागा भरल्या असून, 18 जागा रिक्त राहिले आहेत. त्यातील पुणे शहराला 100 जागा दिल्या असून, नगर नाशिकला 61 जागा देण्यात आले आहेत.