पुणे : शबनम न्यूज
रिझर्व बँक ऑफ इंडिया ने शुक्रवारी दोन हजार रुपयांचे नोटा वितरणातून मागे घेण्याचा निर्णय घेतला .दोन हजार रुपयांचे नोटानागरिकांना 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बँकेत जमा करता येणार आहे.
या निर्णयानंतर विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या कार्यालय बाहेर दोन हजार रुपयांच्या नोटेला हार घालून श्रद्धांजली वाहिली या आंदोलनावेळी राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यांनी प्रतिकात्मक दहा लाख रुपये किमतीच्या दोन हजार रुपयांच्या नोटा फूटपाथ वर ठेवून निषेध नोंदविला
Advertisement