शबनम न्यूज पिंपरी चिंचवड प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती साहेबराव भापकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिका चे प्जितेंद्र वाघ, अति. आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे मारुती भापकर यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की पिंपरी चिंचवड शहरातील मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, चिंचवड स्टेशन, रामनगर,महात्मा फुलेनगर, दत्तनगर, शंकरनगर, विद्यानगर, परशुरामनगर आनंदनगर इंदिरानगर आदि परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा याकरिता रात्रीच्या वेळी “श्वान पथक”कार्यान्वित करावे शहरातील मोहननगर, काळभोर नगर,आकुर्डी , चिंचवड स्टेशन, रामनगर, महात्मा फुलेनगर, दत्तनगर शंकरनगर विद्यानगर परशुरामनगर आनंदनगर इंदिरानगर आदि परिसरात मोकाट कुत्र्यांचा प्रचंड वावर असून त्यामुळे येथील विद्यार्थी महिला जेष्ठ नागरिक कामगार यांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे. या परिसरात मोकाट कुत्री रात्रीच्या वेळेस खूप जोर जोरात भउकंतआत त्यामुळे रात्रीच्या वेळेस नागरिकांची निद्रानाश होतो. लहान मुले घाबरून जागे होतात हे मोकाट कुत्रे लहान मुले महिलांच्या अंगावर गुरु गुरुंन धावतात, त्यामुळे या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच या परिसरात सेकंन्ड थर्ड शिपला जाणारा येणाऱ्या कामगारांच्या वाहनांच्या मागे ही कुत्री धावतात प्रसंगी चावा घेण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहन चालक वाहन जोरात पळवतात या गडबडीत अपघात होतात. यापूर्वी आमच्या मोहननगर परिसरात मे २०२२ मध्ये एक मुलगा व त्याचे आईचा मोठा अपघात झाला होता. या अपघातात आईचा हात व पायी फ्रॅक्चर झाले होते. नशीबाने त्यांचे प्राण वाचले. नंतर संत तुकाराम नगर मधील एका विद्यार्थ्यांचा अतिशय वाईट पद्धतीने कुत्र्यांनी लचके तोडले होते. या घटनांबाबत आम्ही वेळोवेळी तक्रारी दिल्या होत्या. खरे तर आपल्या पशुवैद्यकीय विभागामार्फत वर्षानुवर्षी मोकाट कुत्री पकडणे त्याची निबिंजीकरण करण्याबाबत ठेका देण्यात येतो. पालिका त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करते. मात्र कुत्र्याची संख्या नियंत्रणात येण्याऐवजी वाढतानाच दिसते. नुकतीच मागील आठवड्यात भोसरी लांडेवाडी परिसरात गणेश गायकवाड, अभिजीत काकडे या विद्यार्थ्यांवरती मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून अक्षरशः लचके तोडले. असे प्रकार आमच्या वरील परिसरामध्ये घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुळे आपण विशेष मोहीम राबवुन ही सर्व भटकी कुत्री पकडून त्यावरती योग्य त्या उपाययोजना कराव्यात. तसेच ही कुत्री रात्रीच्या वेळीच अधिक बाहेर पडतात त्यामुळे रात्रीच्या वेळी “श्वान पकडण्याचे पथक”तैनात करावेत पत्राची योग्य दखल घेऊन योग्य कारवाई केली नाही तर आम्हाला नाईलास्तव आंदोलन करावे लागेल असा इशाराही आपल्या निवेदनाद्वारे मारुती भापकर यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेला दिला आहे