पिंपरी चिंचवड महानगरपालिका व टाटा मोटर्स यांच्यामध्ये आज दिनांक ९ जून २०२३ रोजी टाटा मोटर्स पिंपरी येथे मा.आयुक्त. श्री. शेखर सिंह व श्री. विशाल बादशाह, व्हाईस प्रेसिडेंट ऑपरेशन्स (व्हिपी) यांच्या उपस्थितीत ड्वेल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग (डी एस टी) व तांत्रिक सहकार्य (आयएमसी) सामंजस्य करारनामा करण्यात आला.
डीएसटी करारनामा (एमओयू) : सदर करारनामा हा महापालिकेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त व महत्त्वाचा आहे. त्या अनुषंगाने औद्योगिक प्रशिक्षण विभाग डी एस टी कराराच्या माध्यमातून, टाटा मोटर्स सारख्या नामांकित कंपनीसोबत आय.टी.आय. मोरवाडी येथील ०५ ट्रेड व १४ युनिटच्या साधरण २८० विद्यार्थ्यांना अद्यावत तंत्रज्ञान, ऑन जॉब ट्रेनिंग (ओजेटी), कामाचे स्वरूप तथा विद्यार्थ्यांना कंपनीत प्रत्यक्ष काम करण्याची संधी प्राप्त होणार आहे व त्याअनुषंगाने त्यांना विद्यावेतन (स्तायपंड) देखील मिळणार आहे. डीएसटी बाबत अशा प्रकारचा व्यापक करारनामा करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका राज्यातील पहिलीच महानगरपालिका आहे.
तांत्रिक सहकार्याबाबत करारनामा (एम ओ यू) : या करारनामाच्या माध्यमातून मनपाच्या दोन्ही औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना तांत्रिक सहकार्य उपलब्ध होणार आहे. यामध्ये तंत्रज्ञान अद्यावत करणे त्याचप्रमाणे निदेशक व गटनिदेशक यांना टाटा मोटर्स येथे विविध प्रकारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेमधील विद्यार्थ्यांना टाटा मोटर्स येथील तज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. त्याच प्रमाणे आयएमसी कमिटी गठीत करून त्याद्वारे संस्थेमधील कामकाज अद्यावत व कार्यक्षम होण्यास मदत होणार आहे.
मा. आयुक्त सो. यांनी उपरोक्त दोन्ही करारनामा बाबतीत टाटा मोटर्स कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विस्तृतपणे चर्चा केली. डी एस टी च्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यामध्ये वाढ होऊन कंपनीला स्किल वर्क फोर्स मिळण्यास मदत होणार आहे. असे मत व्यक्त केले.
तसेच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्या करिता फायदा होईल. कुशल मनुष्यबळाचे महत्व पाहता औद्योगिक परिसरातील कंपनी अस्थापना यांचे गरजेनुसार व योगदानातून नवीन मागणी असलेले ट्रेडस सुरू करणेचे नियोजन असून विविध कंपनी आस्थापना यांच्या समवेत चर्चा करण्यात येईल असे सांगितले.
सदर कार्यक्रमास टाटा मोटर्स पिंपरी कंपनीचे वतीने प्लांट हेड – श्री. सुनील तिवारी, एचआर हेड – श्री. श्रीनिवासन, ईआर हेड – श्री. प्रणव कुमार, कॉर्पोरेशन स्किल्स हेड – श्री. मार्कल फर्नांडिस, शासकिय व्यवहार – श्री. सुनील भाले, हेड एडमीन – श्री. कर्नल नाडकर्णी, डीजीएम् स्किल्स – श्री. सुशिल वारंग व वरिष्ठ व्यवस्थापक – श्री. शशिकांत रोडे आदी उपस्थित होते. तसेच महापालिकेच्या वतीने मा. अति. आयुक्त – श्री. उल्हास जगताप, मा. प्राचार्य – श्री. शशिकांत पाटील औ प्र विभाग, विशेष अधिकारी जनता संपर्क – श्री. किरण गायकवाड, गटनिदेशक – श्री. प्रकाश घोडके व लिपिक – श्री. विजय चावरीया आदी उपस्थित होते. टाटा मोटर्स चे व्हाईस प्रेसिडेंट श्री. विशाल बादशाह यांनी मा. आयुक्त सो. यांचे आभार मानले. सदर कार्यक्रम उत्साहात व यशस्वीपणे पार पडला.