शबनम न्यूज | पिंपरी
वर्ल्ड व्हिजन संस्था, मुंबई यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष भाऊसाहेब भोईर यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करण्यात येणार आहे. शनिवार, दिनांक १६ सप्टेंबर २०२३ रोजी सकाळी १० ते ०१ या कालावधीत प्रतिभा महाविद्यालय, टायटन शोरूमशेजारी, काळभोरनगर, चिंचवड येथे हा कार्यक्रम संपन्न होईल. कार्यक्रमाच्या दरम्यान संस्थेच्या कार्याध्यक्ष योगिता पाखले भाऊसाहेब भोईर यांच्याशी प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून संवाद साधून त्यांची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय आणि अन्य क्षेत्रातील वाटचाल जाणून घेणार आहेत. गौरवसोहळ्यानंतर लोकप्रिय हिंदी गाण्यांचा आस्वाद रसिकांना घेता येईल. विनाशुल्क असलेल्या या कार्यक्रमाचा लाभ सर्व रसिकांनी आवर्जून घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Advertisement