शबनम न्युज | पुणे
पुण्यातील नवले पुलाजवळ एका तरुणाच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याची घटना घडली आहे. खुना मागचे निश्चित कारण समजू शकले नाही.
सौरभ रुपेश शिंदे (वय 23 रा. आंबेगाव पठार, धनकवडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचे वडील रुपेश शिंदे (वय 49) यांनी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
Advertisement
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगलुरु बाह्यवरण मार्गावर स्वामीनारायण मंदिराच्या परिसरातील मोकळ्या जागेत एक तरुण मृत्तावस्थेत पडल्याची माहिती मिळाली असता, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सदर मृतदेहाची ओळख पटविली. त्यानंतर सौरभच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आल्याचे उघडकीस आले. खुणा मागचे कारण अद्यापही समजू शकले नाही. पसार झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत.