शबनम न्युज | पुणे
येत्या तीन ते चार दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये मान्सून येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. मॉन्सून कोकणात आणि त्यानंतर पुण्यात येणार आहे. राज्यात ढगाळ वातावरण तयार झाल्याने वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. पुण्यात देखील सकाळपासूनच आकाशात ढग तयार झाले असून काही भागात हलक्या सरींनी हजेरी देखील लावली आहे.
अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यासोबत बाष्पयुक्त ओलावा येत असून वाढलेल्या तापमानामुळे दमट व उष्ण वातावरण तयार झाले आहे. परिणामी दुपारनंतर ढगांच्या गडगडासह राज्यात अनेक ठिकाणी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. याच्या दोन दिवसांमध्ये मानसून गोवा ,दक्षिण कोकण, दक्षिण मध्य, महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. अनुपम कश्यमी यांनी दिली आहे.
Advertisement