शबनम न्युज | पिंपरी
शहरातील सायबर गुन्ह्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. शहरातील सायबर गुन्हे रोखण्यासाठी पिंपरी चिंचवड आयुक्तालयाच्या वतीने स्वतंत्र पोलीस ठाणे स्थापन करण्यात आले आहे. ऑनलाइन फसवणूक होण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने तसेच शहरात स्वतंत्र पोलीस ठाणे नसल्याने गुन्ह्यांची तपासणी, गती वाढविण्यात अडथळे निर्माण होत होते. राज्याच्या गृह विभागाने पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे मंजूर केले आहे. त्यामुळे सायबर गुन्ह्यांच्या तपासाला गती मिळणार आहे. शहराला आता 19 पोलीस ठाणे मिळाले आहे.
पिंपरी चिंचवड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तालय 15 ऑगस्ट 2018 मध्ये निर्माण केले होते. त्यामुळे गुन्हे तपासाला गती मिळाली. शहरात पोलीस आयुक्तालयांच्या हद्दीमध्ये पिंपरी चिंचवड शहरासह चाकण ,तळेगाव, हिंजवडी, परिसरात समावेश होतो. एकूण 18 पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्र आयुक्ताअंतर्गत येते. मात्र, गेल्याकाही वर्षांपासून स्वतंत्र सायबर पोलीस ठाणे नसल्याने ऑनलाइन फसवणूक गुन्ह्यात वाढ निर्माण झाली आहे.