शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, वाकड आणि तळेगाव दाभाडे येथे तीन अपघात घडल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून, एकाच्या पायावरून बस गेल्याने तो गंभीर जखमी झाला .या प्रकरणी रविवारी गुन्ह्यांची नोंद झाली आहे.
पहिला प्रकार सोमाटणे फाटा येथे रविवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास अपघात झाला. वीरभद्र रामराव शिरोळे (वय ३८, रा.मावळ) यांच्या अंगावर मयूर जालिंदर साखरे (वय ३०, रा. हिंजवडी) याने त्याच्या ताब्यातील थार गाडी घातली. शिरोळे याच्या पत्नीने तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तर मयूर साखरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसरी घटना भोसरी मधील गाव जत्रा मैदानात खाजगी ट्रॅव्हल बस ने एका तरुणाला धडक दिली. त्यामध्ये तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी घडली. बस चालक शुभम संजय सुरवसे (वय २५, रा. हडपसर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसरी घटना डांगे चौक थेरगाव येथे ट्रॅव्हल बसचे चाक पायावरून गेल्याने एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात रविवारी सकाळी सात वाजताची सुमारास घडला. निलेश ज्ञानशीन इतवाती (वय ३२) असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. निलेश हे डांगे चौक परिसरात पायी रस्ता ओलांडत असताना त्यांना बसणे धडक दिली. बस त्यांच्या दोन्ही पायावरून गेले ते गंभीर जखमी झाले . या प्रकरणी बस चालकाचे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.