शहरातील विविध भागात क्षेत्रीय कार्यालयनिहाय आयोजित करण्यात आलेल्या योग दिन कार्यक्रमांमध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन कार्यक्रमाचा आनंद घेत रोज योगा करण्याचा निर्धारही केला.
पिंपरी चिंचवड महापालिका, आर्ट ऑफ लिव्हींग आणि योग विद्या धाम संस्था पिंपरी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंतरराष्ट्रीय योग दिन २०२४’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आज सकाळी ६.३० वाजता शहरातील विविध ठिकाणी पार पडलेल्या योग दिन कार्यक्रमास उपआयुक्त अण्णा बोदडे, सहाय्यक आयुक्त यशवंत डांगे, पंकज पाटील, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, क्रिडा अधिकारी अनिता केदारी, सहाय्यक आरोग्य अधिकारी शांताराम माने, क्रीडा पर्यवेक्षक गोरक्ष तिकोने, अरुण कडूस, अनिल जगताप, रंगराव कारंडे, दीपक कन्हेरे, बन्सी आटवे, जयश्री साळवे, क्रीडा शिक्षक रवींद्र कांबळे, विजय लोंढे, सुभाष जावीर, हनुमंत सुतार, अशोक शिंदे, सोपान खोसे, मंगल जाधव, सुनिता पालवे, प्रशांत उबाळे, भाऊसाहेब खैरे, दादाभाऊ होलगुंडे, राजेंद्र सोनवणे,सुप्रिया जाधव,दीपक जगताप, वाल्मिक पवार, हरिभाऊ साबळे, पारधी पुनाजी, आरोग्य निरीक्षक वैभव घोळवे, राजेंद्र उज्जेन्वाल, योग विद्या धाम केंद्र प्रमुख प्रमोद निफाडकर, योग प्रशिक्षक योगेश्वरी भट, संजना मुंगळे, सचिन नाईक, शुभांगी गिरमे, मृणाल देशपांडे यांच्यासह महापालिकेचे अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
“अ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात निगडी प्राधिकरण येथे मदनलाल धिंग्रा मैदान बॅडमिंटन हॉल, नेताजी सुभाषचंद्र बोस बॅडमिंटन कोर्ट, “ब” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात चिंचवड येथील फत्तेचंद जैन स्कुल शेजारील पवनानगर बॅडमिंटन हॉल, “क” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पिंपरी येथील मासुळकर कॉलनीतील डॉ. हेडगेवार क्रीडा संकुल, “ई” क्षेत्रीय कार्यालयाच्या क्षेत्रात भोसरीतील आदर्श शाळेजवळील दिघी रोड परिसरातील बॅडमिंटन हॉल आणि गव्हाणे वस्ती बॅडमिंटन हॉल, “फ” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात चिंचवड मधील कृष्णानगर येथील स्वामी विवेकानंद क्रीडा संकुल, निगडीतील यमुनानगर येथील छत्रपती शिवाजी महाराज बॅडमिंटन हॉल, “ग” क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत पिंपरीगाव येथील कापसे आळीतील काशिबा शिंगे बॅडमिंटन कोर्ट आणि थेरगाव येथील डांगे चौकातील मथाबाई डांगे बॅडमिंटन हॉल, “ह” क्षेत्रीय कार्यालयाच्या परिसरात संत तुकारामनगर येथील संत तुकाराम पुतळ्यासमोरील सरदार वल्लभभाई पटेल बॅडमिंटन हॉल, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील कै. काळूराम जगताप बॅडमिंटन हॉल आणि नवी सांगवी येथील पी. डब्ल्यू. डी. मैदानातील नवी सांगवी बॅडमिंटन कोर्ट येथे महापालिकेच्या वतीने योगा कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
आजच्या या योग दिनामिनित्त आयोजित कार्यक्रमांस माजी नगरसदस्य,नगरसदस्या आदींचा समावेश होता. यावेळी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांनी पर्यावरणपूरक वसुंधरा शपथही घेतली.