शबनम न्युज | पुणे
चारित्र्याचा संशयावरून पतीने पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. शितल स्वप्नील रणपिसे (वय २३, रा. रांजणगाव, ता. शिरूर, पुणे) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. या प्रकरणी स्वप्निल शामराव रणपिसे (वय २६) याला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सात महिन्यापूर्वी स्वप्निलचा शितल सोबत विवाह झाला होता. मात्र, स्वप्निलचा स्वभाव हा संशयी होता. तो प्रत्येक कारणावर संशय करत असे. लग्नाच्या सात महिन्यानंतर स्वप्नील शितल वर चारित्र्याचा संशय घेत असे. या कारणामुळे स्वप्नीलने शितलला विजेचा धक्का देत तिचा गळा आवरून खून केले. नवविवाहित तरुणीचा खून झाल्याने पोलिसांनी तपासाबाबत सूचना दिल्या. तपासादरम्यान स्वप्नील ने पोलिसांकडे फिर्याद दिली होती. पोलिसांनी चौकशी सुरू केली असता, तपासात स्वप्निलवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. तेव्हा त्याने चारित्र्याच्या संशयावरून शितलचा खून केल्याची कबुली दिली.