शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील दोन जोडप्यांनी आंतरधर्मीय विवाह केल्याने मुलीच्या भावाने बहिणीच्या पतीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. सुशांत गोपाळ गायकवाड, गणेश गायकवाड आणि पंकज विश्वनाथ पाईकराव या तिघांपैकी दोघांना पिंपरी चिंचवडच्या भोसरी एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. अमीर मोहम्मद शेख असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आमिरने सुशांतच्या बहिणी सोबत आंतरधर्मीय केला होता. जो काही कुटुंबाला मान्य नव्हता. याच रागातून सुशांतने आमिरची हत्या केली. अमीर आणि निकिता यांचे प्रेम संबंध होते. दोघेही एकाच गावची होती. त्यांच्या या प्रेमविवाहाला गायकवाड कुटुंबाची संमती नव्हती. कुटुंबाचे विरोधात जाऊन दोघांनी आंतर धर्मीय विवाह केला. गावात राहिल्याने आणखी वाद उद्भवू शकतो हे लक्षात आल्यानंतर ते पुण्यात आले.
पाच-सहा महिन्यांपासून दोघेही पुण्यातील मोशी येथे सुखी संसार करत होते. याचदरम्यान निकिता उर्फ अरीना हिच्या बहिणीच्या पतीने आमिर सोबत जवळीक वाढवली. 15 जून रोजी आमिर शेख हा कंपनीत जातो म्हणून घराबाहेर पडला. तेव्हा साडू पंकज पाईकराव ने त्याला मद्यपान करण्यास पुणे-नाशिक रोडवरील एका हॉटेलमध्ये बोलावले. तिथे दोघेजण दारू प्यायला गेले, त्यानंतर पुन्हा हॉटेलमधील दारू नेऊन सर्वजण आळंदी-चाकण रस्त्यावर जवळील जंगलात बसून प्यायला लागली. सुशांतने पंकज ला फोन करून बाजूला जाण्यास सांगितले, तो बाजूला गेल्यानंतर सुशांत आणि गणेश यांनी आमिरला बेदम मारहाण केली. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. याबाबत अधिक तपास पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय करीत आहेत.