शबनम न्युज | मुंबई
दिवंगत शिवाजीराव देसाई यांच्या 38 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
पावनगड या मंत्री निवासस्थानी राज्य उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह पाटण मतदारसंघातील लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विधानसभा अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही स्व. देसाई यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
Advertisement