शबनम न्युज | मुंबई
राज्यात विधान परिषदेची निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. विधान परिषदेच्या ११ जागांसाठी तब्बल १२ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी गुप्त पद्धतीने मतदान होत आहे. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी अशा दोन्ही बाजूने आमचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा केला जात आहे. त्यामुळे आता नेमका कोणाचा उमेदवार पराभूत होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान, या निवडणुकीत भाजपाचे पाच उमेदवार रिंगणात रिंगणात होते. त्यापैकी पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. यामध्ये पंकजा मुंडे, योगेश टीळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे.
यामध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पंकजा मुंडे यांना 26 मते मिळाली त्या विजयी झाल्या आहेत तसेच परिणय फुके यांना 26 मते मिळाली तेही विजयी झाले. योगेश टिळेकर यांना 23 मते मिळाली त्याचबरोबर अमित गोरखे यांना 23 मते मिळाली तेही विजयी झाले. व भारतीय जनता पार्टीचे सदाभाऊ खोत यांना 24 मते मिळाली तेही विजयी झाले.