शबनम न्युज | मुंबई
“माझ्या विजयाचा आनंद लोकांना झाला आहे. याचा फार मला आनंद आहे. जिथे जास्त योगदान देऊ शकेल, तिथे चांगलं काम करेल,” अशी प्रतिक्रिया भाजपच्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे.
आज विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत 12 उमेदवार रिंगणात उतरले होते. यामध्ये भाजपच्या पंकजा मुंडे यांच्यासह योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. सदर निवडणुकीत भाजपचे सर्वच उमेदवारांचा विजय झाला आहे. या निवडणुकीत पंकजा मुंडे यांनी 26 मतांनी विजय मिळविला आहे.
विजयानंतर त्या म्हणाल्या, “मला आनंद वाटत आहे. मी पक्षासाठी अधिक जोमाने काम करेल. तसेच माझ्या विजयाचा आनंद लोकांना झाला आहे, याचा फार मला आनंद आहे. जिथे जास्त योगदान देऊ शकेल, तिथे चांगलं काम करेल. आता राज्यात काम करण्याची संधी मिळाली आहे. या निवडणुकीत ज्यांनी मदत केली, त्या सर्वांचे आभार मानते. लोकांच्या चेहऱ्यांकडे पाहून आनंद वाटतोय,” असेही पंकजा मुंडे म्हणाल्या.