आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नांना यश:लाड-पागे समितीच्या शिफारशी नुसार अनुसूचित जाती मधील राज्यभरातील साडे बारा हजार सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना मिळणार नोकरीचा हक्क
शबनम न्यूज , प्रतिनिधी :
पिंपरी- सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी मिळण्यासाठी लाड पागे समिती ने अहवाल सादर केला होता त्यानुसार मेहतरकी व सफाई काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा वारसांना नोकरी मिळत असे.लाड पागे समिती ने आपला अहवाल सादर करताना मेहतरकी चे काम करणाऱ्या मेहतर,भंगी,व वाल्मिकी समाजाला व सफाई काम करणाऱ्या महार,मांग व इतर मागासवर्गीय जातीं मधील कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरी द्यावी अस स्पष्ट उल्लेख होता.शासनाने २०२३ मध्ये सफाई कर्मचाऱ्यांची व्याख्या विस्तृत करत नवा शासन निर्णय जाहीर केला ज्या मध्ये कोणत्याही समाजाचा का असेना त्यांच्या वारसांना देखील लाड पागे समितीच्या शिफारशी लागू होतील व ते देखील नोकरीस पात्र होतील.मात्र त्या शासन निर्णयाला काही लोकांनी न्यायालयात आव्हान केले होते तेव्हा औरंगाबाद (संभाजी नगर) खंडपीठाने लाड पागे समिती च्या शिफारशी नुसार मिळणाऱ्या वारसा नोकरीना स्थगिती मिळाली होती.त्यानंतर मेहतर,भंगी व वाल्मिकी समाजाला स्थगिती मधून वगळण्यात आले होते.मात्र अनुसूचित जाती मधील लोकांना दिलासा मिळाला नव्हता त्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमधील पासष्ट कुटूंब व राज्यभरातील सुमारे साडे बारा हजार कुटूंबाचे भविष्य यामुळे अंधारात गेले होते त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांनी सतत मंत्रालयात जाऊन सचिव,उपसचिव यांना भेटून न्यायालयात शासनाची बाजू लावून धरावी,सरकारी वकिलांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे यासाठी पाठपुरावा केला होता.त्याला न्यायालयात यश मिळाले.औरंगाबाद खंडपीठाने अनुसूचित जाती जमाती च्या कर्मचाऱ्यांना दिलासा दिला होता मात्र त्याची अंमलबजावणी होत नव्हती.त्यामुळे आमदार अण्णा बनसोडे यांनी सामाजिक न्याय विभागात ठाण मांडून कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार नवीन शासन निर्णय निर्गमित करावा यासाठी प्रयत्न केले व आज सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे कक्ष अधिकारी संदीप जाधव यांच्या सहीने आज नवीन पत्रक निघाले आहे त्यानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिके सह राज्यभरातील साडे बारा हजार अनुसूचित जाती मधील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काने नोकरीचा मार्ग मोकळा झाला आहे.आमदार अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नामुळे आमच्या वारसांना नोकरी मिळणार असल्याची प्रतिक्रिया सर्व लाभार्थ्यांनी बोलून दाखवली.