शबनम न्युज | पुणे
पुण्यासह पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत आहे/ या वादळी पावसाच्या जोरामुळे शहरातील झाडे कोसळून वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. शहरातील अनेक ठिकाणी झाडे कोसळून वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यामध्ये चिंचवड ,आकुर्डी, नवी सांगवी, नेहरूनगर भागातील झाडे कोसळले आहे. तर तेथे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे .तसेच वाहनांचे नुकसान देखील झाले आहे.
पिंपरी चिंचवड शहरात शनिवारी रात्री आठ वाजल्यापासून जोरदार पावसाला सुरुवात झाली होती. शहर परिसरातील विविध भागांमध्ये रात्री पाऊस कोसळत होता. रविवारी सकाळी १० ते १२ या वेळेत काही काळ उसंत दिली होती. मात्र, दुपारी पुन्हा पावसाला सुरुवात झाली. तर पुन्हा सायंकाळी उघडीत दिली. यामुळे पावसाचा बाजारपेठेवर देखील मोठा परिणाम झाला.
शहरात चिंचोळे, एमआयडीसीतील केएसबी चौक येथे सकाळी ९:१५ वाजता एक झाड पडले. याशिवाय जोरदार पावसामुळे चिंचोली विजयनगर झोपडपट्टी येते पावणे बाराच्या सुमारास झाड पडले. नेहरूनगर येथील मारुती मंदिर जवळ देखील दुपारी बारा वाजता झाडे पडले, तर जुनी सांगवी येथील नॅशनल गार्डन येथे दुपारी एक वाजता झाड पडले. तर फुगेवाडीतील आनंद वसाहत येथे दुपारी दीड वाजता झाड पडले. झाड कोसळल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला, याबाबत अग्निशमन दलाला माहिती मिळाल्यानंतर त्यांनी रस्त्यावरील झाड हटवून वाहतूक हटविली.