शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहराचे राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार) गटाचे शहरअध्यक्ष अजित गव्हाणे यांनी काल शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. तसेच आज त्यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी 25 नगरसेवकांनी तसेच पदाधिकारी यांनी शरद पवार गटात प्रवेश केला.
अजित गव्हाणे यांच्यासह माजी महापौर हनुमंतराव भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक पंकज भालेकर,प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांचे पुत्र यश साने, माजी नगरसेवक संजय नेवाळे, वसंत बोराटे, विनया तापकीर, माजी विरोधी पक्षनेते राहुल भोसले, माजी नगरसेवक समीर मासुळकर, गीता मंचरकर, संजय वाबळे, वैशाली उबाळे, शुभांगी बोराडे, अनुराधा गोफणे, घनश्याम खेडेकर, तानाजी खाडे, शशीकिरण गवळी, विजया तापकीर, युवक राष्ट्रवादी भोसरी विधानसभा अध्यक्ष सागर बोराटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती निवृत्ती मामा शिंदे, विशाल आहेर, युवराज पवार, कामगार आघाडीचे विशाल आहेर, नंदूत्यात्या शिंदे, शरद भालेकर यांनी देखील राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटात प्रवेश केला आहे. तसेच पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचे पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडून स्वागत करण्यात आले.
यावेळी प्रतिक्रिया देताना अजित गव्हाणे म्हणाले की, पिंपरी चिंचवड मध्ये 2017 नंतर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपची सत्ता आली, त्या अगोदर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची सत्ता होती. भाजपच्या सत्तेनंतर महापालिका आणि शहर विकासाच्या बाबतीत अधोगतीकडे जाताना दिसून आले. तर भोसरी विधानसभेकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होऊ लागले. एक हाती सत्ता अजित दादांकडे नसल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली. तसेच आमच्या भोसरी विधानसभेच्या बाबतीत दुर्लक्ष झाले, आता पुढची पन्नास वर्ष डोळ्यासमोर ठेवून विकास करणे गरजेचे आहे. परंतु, तसे न होता नुसते पैसे खर्च झाले. पण विकास आम्हाला दिसला नाही. मी आता विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहे. गेल्या काही वर्षांपासून मी विधानसभेच्या प्रयत्नात होतो, आता भोसरीचा विकास करण्याची इच्छा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.