शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड लघु उद्योजक संघटनेचे संस्थापक तात्या सपकाळ यांच्या जीवन कार्यावरील ” कर्मयोगी तात्या सपकाळ” या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी ( ता.२०) ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
पिंपरी येथील नव महाराष्ट्र विद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी चार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाला माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील उपस्थित राहणार आहेत.
लघु उद्योजक संघटनेचे तब्बल तीस वर्ष अध्यक्ष तसेच स्व. यशवंतराव चव्हाण स्मारक समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष म्हणून तात्यासाहेब सपकाळ यांनी दिर्घकाळ काम पाहिले. पिंपरी चिंचवड एमआयडीसीच्या स्थापनेपासून या शहराची निर्मिती, वाढ आणि विस्तार याचे साक्षीदार असलेल्या तात्यासाहेबांच्या या जीवनपटाचे लेखन व संपादन ज्येष्ठ पत्रकार विजय जगताप यांनी केले आहे.
सातारा ही जन्मभूमी आणि पिंपरी चिंचवड ही कर्मभूमी असलेल्या तात्यांच्या या जीवन पट पुस्तकात त्यांच्या संघर्षमय प्रवास रेखाटण्यात आला आहे.
या वेळी पवार साहेबांच्या हस्ते तात्यासाहेब सपकाळ यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त सत्कार करण्यात येणार असल्याचे स्व. सचिन सपकाळ एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष सुयोग सपकाळ यांनी सांगितले.