पिंपरी चिंचवड ,प्रतिनिधी:
चिंचवड विधानसभा मतदार संघामधील मतदारांच्या मतदार याद्यांमध्ये दुरुस्त करण्याची मागणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा भाजपचे शहर उपाध्यक्ष सिद्धेश्वर बाळासाहेब बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
निवडणूक आयोगाला दिलेल्या निवेदनात सिद्धेश्वर बारणे यांनी नमूद केले आहे की चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा अधिक मतदार असलेला मतदार संघ आहे, या मतदारसंघात मतदारांची संख्या जास्त असल्याने या मतदारसंघातील मतदारांची नावे असलेली यादी पूर्ववत करण्यात यावी. तसेच दुबार नावे वगळण्यात यावी ,त्याचप्रमाणे मयतांची नावे ही वगळण्यात यावी ,मतदारांचे फोटो अद्यतन करण्यात यावे ,मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करण्यात यावी. तसेच नवीन मतदारांचे मतदान कार्ड हे लवकरात लवकर वाटप करण्यात यावे, त्याचप्रमाणे नवीन मतदार नाव नोंदणी करिता कार्यकाळ वाढवून देण्यात यावा .अशा प्रकारच्या मागण्या सिद्धेश्वर बारणे यांनी निवडणूक आयोगाकडे केल्या आहेत.
सिद्धेश्वर बारणे चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविण्यास इच्छुक आहे, त्यांनी आपली तयारी पूर्ण केली असून मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहे या अनुषंगाने निवडणूक आयोगाला चिंचवड विधानसभा मतदारसंघाची मतदार यादी दुरुस्त करण्याबाबत निवेदन देण्यात आले.