शबनम न्युज | पिंपरी
शरद पवार हे माझे दैवत. मी कधीही त्यांचं अपमान करणार नाही, असे वक्तव्य रविवारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात केले. शनिवारी शरद पवार यांच्या विजय संकल्प मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांनी टीका केल्यानंतर आज अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांना उत्तर दिले. तसेच शरद पवार यांचा मी कधीही अपमान करणार नाही, असेही सांगितले.
शनिवारी निधी वाटपाबाबत पुण्यात बैठक संपन्न झाली. या बैठकीमध्ये मावळ विधानसभा मतदार संघाकरिता जास्तीचा निधी देण्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला त्यानंतर निधीवाटप कसा केला जातो, याची माहिती शरद पवार यांनी अजित पवार यांच्याकडे मागितली. त्यामुळे निमंत्रित खासदारांना प्रश्न विचारण्याचा अधिकार नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला होता तसेच असे करून अजित पवार यांनी शरद पवार यांचाही अपमान केल्याचे सांगितले. या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी वक्तव्य केले.
रविवारी पिंपरी चिंचवड शहरात काळेवाडी येथे संपन्न झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात माजी आमदार विलास लांडे, पिंपरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अण्णा बनसोडे, जेष्ठ नगरसेवक योगेश बहल, जेष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, जेष्ठ नगरसेवक नाना काटे, माजी नगरसेवक राजू मिसाळ, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, युवा नेते श्याम लांडे, प्रशांत शितोळे, माजी नगरसेविका मंगला कदम,माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, शहर अध्यक्ष कविता आल्हाट, माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, माजी नगरसेविका शमीम पठाण, युवा नेते प्रसन्न डांगे, माजी नगरसेवक सतीश दरेकर, युवा नेते प्रशांत सपकाळ यांच्यासह अनेक पदाधिकारी,आजी-माजी नगरसेवक उपस्थित होते.
आगामी काळात राष्ट्रवादी पक्ष वाढविण्यासाठी अथक प्रयत्न करणार असल्याचे या मेळाव्यात सर्वांनीच सांगितले. तसेच राष्ट्रवादी पक्ष पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात वाढविण्यासाठी आजी-माजी नगरसेवकांसह युवकांनी ही प्रयत्न करावेत, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.