शबनम न्यूज | पिंपरी
राज्यात मागील काही दिवसांपासून ‘हिट अँड रन’च्या घटकांमध्ये वाढ होताना दिसत आहे. हिट अँड रन या घटनेत वाढ होणे म्हणजे एक चिंतादायक घटना घडत असल्याचे व्यक्त केले जात आहे. दरम्यान, आज पिंपरी गावात कारने पादचारी महिलेला धडक देऊन पसार झाल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे. रविवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली आहे. कार चालकाने जाणीवपूर्वक महिलेला धडक दिल्याचं प्रथमदर्शनी दिसत आहे. महिलेला धडक देऊन कार चालक फरार झाला आहे.
पिंपरी- चिंचवड मधील पिंपरी गावात अज्ञात भरधाव कारने पादचारी महिलेला धडक देऊन चालक फरार झाला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिंपरी पोलीस वाहन चालकाचा शोध घेत आहेत.
Advertisement
Advertisement
Advertisement
Advertisement