शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका सेवकांची सहकारी पतसंस्थेच्या सन 2023 ते 2018 या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये संचालक मधून दिनांक 22 जुलै रोजी झालेल्या संचालक मंडळ सभेत पण संस्थेचे चेअरमन पदी चारुशीला किशोर जोशी यांची व चेअरमन पदी विजय मुरलीधर नलावडे व सेक्रेटरी पदी योगेश सूर्यकांत रानवडे व खजिदानपदी विशाल बाळासाहेब भुजबळ यांची निवड करण्यात आली आहे. सदर निवड संतोष लादे, (निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे) शहर 1 यांच्या अध्यक्षतेखाली व पिंपरी चिंचवड मनपा कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव झिंजुर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
यावेळी संस्थेचे पदाधिकारी व विद्यमान संचालक अध्यक्ष शशिकांत उर्फ बबनराव हिंजवडे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेचा कारभार हा विनम्र आणि तत्पर सेवा व पारदर्शक व्यवहार व्यवस्थित रित्या चालविण्याचा संकल्प याप्रसंगी केला.
याप्रसंगी पतसंस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी बचतीच्या सवयी लागण्यासाठी ठेवींवर जास्तीत जास्त नऊ टक्के व्याज व कन्यादान ठेवींवर दहा टक्के ते 10.50% व्याजदर करून संस्था स्वभांडवलांवर उभी करण्याची धोरण ठरविले आहे. तसेच सभासदांना कमीत कमी 11 टक्के व्याज दराने कर्ज पुरवठा करून सभासदांची आर्थिक अडचणी दूर करणार आहोत. तसेच लाभांश वाटप करून सभासदांना आर्थिक मदत करत आहोत. संस्थेच्या सलग 25 वर्ष सभासद व सेवानिवृत्त सभासदांना बक्षीस म्हणून रुपये 5000 वाटप करीत आहोत. तसेच संस्थेच्या मदतीस सभासदांचे कर्ज माफ करणारी महाराष्ट्रातील पहिली पतसंस्था आहे. सतत सभासदाच्या हितासाठी व तत्पर सेवेसाठी सदैव आग्रही असणाऱ्या संस्थेच्या आर्थिक उलाढालीमध्ये अधिकाधिक वाढ करण्याचे व सभासदांचे अडचणी दूर करण्याचे संस्थेच्या नवनिर्वाचे पदाधिकारी व संचालक मंडळाने एक विचाराने केला आहे. असा निर्धार यावेळी नवनिर्वाचित सभासदांनी केला.
यावेळी संस्थेचे विद्यमान संचालक व माजी पदाधिकारी सनी कदम, वैभव देवकर, विजया कांबळे, विश्वनाथ लांडगे आणि लखन शिवाजी येळवडे, संदीप कापसे, नथा मातेरे, भास्कर फडतरे, चंद्रकांत भोईर, कृष्णा पारगे, गणेश गवळी, अभिषेक फुगे, ज्ञानेश्वर शिंदे, विजय मुंडे, युनूस पगडीवाले व संस्थेचे सल्लागार मनोज म्हात्रे, नितीन समगीर, संजय कापसे, मंगेश कलापुरे, उमेश बादल, चंद्रशेखर गावडे, विशाल बाणेकर व प्रभागातील संघटनेचे पदाधिकारी व व्यवस्थापक प्रभात सुतार तसेच महासंघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.