शबनम न्यूज, प्रतिनिधी :
पिंपरी चिंचवड मध्ये 16 वर्षीय मुलाने 14 व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या अल्पवयीन मुलाने आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहून ठेवले त्यामध्ये लॉक ऑफ आणि आय क्वीट अशा शब्दांचा वापर केला आहे. पिंपरी चिंचवड शहराच्या किवळे भागात 26 जुलै रोजी अवघ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने 14 व्या मजल्या वरून उडी मारून आत्महत्या केली. त्याच्या आत्महत्येच्या नोटमुळे ऑनलाइन गेम खेळण्यातून हा प्रकार घडला असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु नेमका कोणता गेम हा मुलगा खेळत होता हे स्पष्ट झाले नाही. यासंदर्भात पिंपरी चिंचवड पोलीस अधिक तपास करत आहेत. या मुलाचे वडील हे परदेशात असतात अल्पवयीन मुलगा, आई आणि लहान भाऊ असे तिघेजण किवळे येथील एका सोसायटीत राहायला आहेत.ऑनलाइन गेम चा टास्क
पूर्ण करण्यासाठी या अल्पवयीन मुलाने 14 व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. पोलीस तपास करीत आहेत