शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे दिवंगत नगरसेवक जावेद शेख यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त विठ्ठल प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष निखिल उमाकांत दळवी यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबविले गेले.दिनांक – ३१ जुलै २०२४ बुधवार सकाळी ८ वाजत पुनरूत्थान समरसता गुरुकुलम चिंचवड या ठिकाणी शिक्षण घेत असणाऱ्या अनाथ मुलांना फुल स्केप वही व पेन पेन्सिल शिक्षण उपयोगी साहित्यांचे वाटप करण्यात आले .
या वेळी अभिजित सोणके, ऋषिकेश घोरपडे, राहुल कांबळे, ऋषिकेश कडव, तन्मय चव्हाण, धनंजय पेठे आदी उपस्थित होते.
निखिल उमाकांत दळवी हे आपल्या विठ्ठल प्रतिष्ठान वतीने अनेक वर्षापासून विविध सामाजिक उपक्रम राबवत आले आहेत. शिवसेनेचे युवा शहर उपप्रमुख म्हणून ते शहरात कार्यरत आहेत. स्व. जावेद शेख यांचे समर्थक असणारे निखिल दळवी जावेद शेख यांचा समाजकार्याचा वारसा पुढे नेत आहे.