शबनम न्यूज , संपादकीय लेख :
पिंपरी चिंचवड शहरातील ज्येष्ठ नगरसेवक तथा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शाखेचे शहराध्यक्ष भाऊसाहेब भोईर यंदा चिंचवड विधानसभा मतदारसंघ गाजवणार असल्याचे दिसत आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघ आपण लढविणार आणि जिंकणार असे काही दिवसापूर्वीच भाऊसाहेब भोईर यांनी प्रसार माध्यमांकडे बोलताना सांगितले.
भाऊसाहेब भोईर हे मागील अनेक वर्षापासून विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक आहे. परंतु पक्षश्रेष्ठींच्या सांगण्यामुळे त्यांनी नेहमी माघार घेतली परंतु यावेळी भाऊसाहेब भोईर यांनी आपण चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणारच अशी ठाम भूमिका घेतली आहे .
6 ऑगस्ट रोजी त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात पिंपरी चिंचवड शहरात साजरा होत असताना या आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाऊसाहेब भोईर यांनी तीन ऑगस्ट पासून संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघात ठिकठिकाणी वेगवेगळे उपक्रम आयोजित केले आहे. यामध्ये चिंचवड विधानसभा मतदारसंघातील बहुभाषिक मतदारांसाठी म्हणजेच प्रत्येक भाषेतील मतदारांसाठी विविध नाटक, गाण्यांचे कार्यक्रम, संगीत कार्यक्रम असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले आहे. यामध्ये अहिराणी भाषेतील विनोदी नाटक, राजस्थानी भजन संध्या , बंगाली गीताचा कार्यक्रम तसेच मराठी भाषेतील लावणी महिलांसाठी ,महिलांसाठी होम मिनिस्टर तसेच किशोर कुमार यांचा गाण्यांचा कार्यक्रम , शिवतांडव हा भाऊसाहेब भोईर निर्मित महानाट्य असे विविध कार्यक्रम भाऊसाहेब भोईर यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण चिंचवड विधानसभा मतदारसंघातील मतदारां करिता आयोजित केले आहे.
भाऊसाहेब भोईर चिंचवड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेणे, त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे, आपल्या समर्थक कार्यकर्त्यांच्या बैठक घेणे , विधानसभा मतदार संघातील कार्यक्रमांना भेटी देणे या गोष्टीवर जास्त भर देत आहेत निवडणूक लढविण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी आपले काम सुरू केले आहे.
भाऊसाहेब भोईर सध्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी चे नेते आहेत व अजित पवार यांची राष्ट्रवादी हा महायुतीचा एक घटक पक्ष आहे त्यामुळे चिंचवड विधानसभा मतदारसंघात उमेदवारी मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागणार हे भाऊसाहेब भोईर यांना माहीत असल्याने जर आपल्याला पक्षाच्या वतीने उमेदवारी मिळाली नाही तरी आपण यंदा ही निवडणूक लढविणारच अशी ही ठाम भूमिका भाऊसाहेब भोईर यांनी घेतली असल्याचे दिसत आहे.
भाऊसाहेब भोईर यांनी 2009 साली चिंचवड विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती या निवडणुकीत भाऊसाहेब भोईर यांना तिसऱ्या क्रमांकाचे मतदान मिळाले होते. काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार असताना भाऊसाहेब भोईर यांना तिसऱ्या क्रमांकाची मते मिळणे हे एक विरोधकांचे षडयंत्र असल्याचे भाऊसाहेब भोईर नेहमी सांगत असतात. 2009 साली राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षात आघाडी होती परंतु या आघाडीतील नेत्यांनी दगा दिल्याने आपला पराभव झाला असल्याचे भाऊसाहेब भोईर यांनी सांगितले आहे. त्यानंतर 2014 व 2019 तसेच मागच्या वर्षी झालेली 2023 ची पोटनिवडणूक या निवडणुकीसाठीही भाऊसाहेब भोईर हे इच्छुक होते परंतु पक्षश्रेष्ठींच्या विनंतीला मान देत त्यांनी या निवडणुकीतून माघार घेतली. परंतु यंदा 2024 च्या विधानसभा निवडणुकीत आपण ही निवडणूक लढविणारच अशी ठाम भूमिका घेतल्याने आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात आपला झंजावत भाऊसाहेब भोईर यांनी सुरू ठेवल्याने चिंचवड विधानसभा मतदारसंघ यंदा भाऊसाहेब भोईर गाजणार यात शंका नाही.
पिंपरी चिंचवड शहराला अभिमान वाटावा असे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे शंभरावे नाट्य संमेलन पिंपरी चिंचवड शहरात भाऊसाहेब भोईर यांच्या नेतृत्वात संपन्न झाले. या नाट्य संमेलनाच्या निमित्ताने भाऊसाहेब भोईर यांनी आपले वर्चस्व पिंपरी चिंचवड शहरावर कायम ठेवले असल्याचे दिसून आले. संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात सांस्कृतिक, नाट्य, कला तसेच सामाजिक कार्याच्या माध्यमातून भाऊसाहेब भोईर यांनी संपूर्ण पिंपरी चिंचवड शहरात आपला ठसा उमटविला आहे. राजकीय जाणकार तसेच पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ हे त्यांना पिंपरी चिंचवड शहराचे सांस्कृतिक मंत्री म्हणूनही संबोधतात. त्यामुळे भाऊसाहेब भोईर यांची चिंचवड विधानसभा मतदारसंघावर चांगली पकड असल्याचे सांगण्यात येते. तसेच भाऊसाहेब भोईर यांचे सर्व पक्षांच्या नेत्यांशी चांगले संबंध आहेत. मैत्रीचे संबंध त्यांनी सर्व पक्षातील नेत्यांशी कायम ठेवले आहे. विरोधी पक्षातील नेते असो किंवा स्वपक्षातील नेते सर्व नेत्यांशी भाऊसाहेब भोईर यांचे आपुलकीचे नाते आहे. विरोधी पक्षातील नेतेही भाऊसाहेब भोईर यांना मान देतात, मानतात ही भाऊसाहेब भोईर यांची जमेची बाजू आहे. मागील तीस वर्षापासून भाऊसाहेब भोईर राजकारणात सक्रिय असून या तीस वर्षात भाऊसाहेब भोईर यांनी पिंपरी चिंचवड शहरात अनेक विकास कामे केली, सामाजिक तसेच राजकीय कार्य सुरू असताना त्यांच्या माध्यमातून अनेक घटकातील कुटुंबांना त्यांच्या माध्यमातून मदत मिळाली आहे. त्यामुळे भाऊसाहेब भोईर हे यंदा चिंचवड विधानसभा मतदारसंघ लढविणार आणि जिंकणार या त्यांच्या ठाम भूमिकेमुळे चिंचवड विधानसभा गाजविणार यात शंका नाही.