शबनम न्यूज , प्रतिनिधी :
किवळे विकासनगर मामुर्डी साईनगर मधील अनेक विकासकामे विकासनगर मुख्य रोड मुकाई चौक ते शिंदे पंप रोड ,गार्डन, अग्निशामक केंद्र मंजूर असूनही काम सुरु केले नाही यासह अनेक मंजूर कामे सुरु करण्यास मनपा विलंब करत असुन लवकरात लवकर सुरु करावे या आशयाचे पत्र शिवसेने चे युवासेना जिल्हाप्रमुख मावळ लोकसभा पिंपरी चिंचवड तथा राजेंद्र तरस सोशल फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र तरस यांनी राज्य चे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पिंपरी चिंचवड शहरातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला तसेच पूरग्रस्त नागरिकांना भेटून त्यांच्याशी संवाद साधला ,तसेच त्यांना मदत केली या निमित्ताने एकनाथ शिंदे यांच्याकडे पिंपरी चिंचवड शहरातील अनेक नेत्यांनी शहरातील विकास कामांबाबत निवेदने दिली.
त्याच बरोबर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे हद्दीतील किवळे विकास नगर येथील शाळा क्रमांक 95 व किवळे गाव येथील शाळेतील विद्यार्थ्यांना तात्काळ रेनकोट वाटप करण्या बाबत हि तरस यांनी पत्रात नमूद केले आहे.
सध्या पावसाळा सुरू असून पावसाचे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे .महानगरपालिकेच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना महानगरपालिकेमार्फत रेनकोट वाटप केलेले नसून सर्व विद्यार्थी भर पावसात शाळेत जातात तरी पिंपरी चिंचवड महापालिकेचे सर्व शाळांमध्ये लवकरात लवकर रेनकोट उपलब्ध करून देण्यात यावे असे हि तरस यांनी नमूद केले आहे