* भाजपा आमदार महेश लांडगे यांचा झंझावात
* एकाच दिवशी तब्बल 16 विकासकामांचा ‘‘श्रीगणेशा’’
शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील रुपीनगर- तळवडे भागातील सर्वसामान्य नागरिकांच्या मागणीनुसार, विविध विकासकामांचा अक्षरश: ‘मान्सून धमाका’ सुरू आहे. एकाच दिवसांत या भागातील लहान-मोठ्या १६ विकासकामांचा ‘‘श्रीगणेशा’’ करण्यात आला. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.
भाजपाचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने रुपीनगर- तळवडे येथील विविध विकासकामाना चालना देण्यात आली. यावेळी माजी नगरसेवक शांताराम भालेकर, पांडुरंग भालेकर, निलेश भालेकर, भाजपाचे किरण पाटील, अस्मिता भालेकर, डॉ. सोमवंशी, शिरीष उत्तेकर, संदीप जाधव, रमेश भालेकर, अनिल भालेकर, शरद भालेकर, रवि सेठसंधी, प्रमोद भालेकर, एस. डी. भालेकर, मुन्ना पवार, ज्ञानेश्वर उर्फ माऊली भालेकर यांच्यासह स्थानिक नागरिक आणि सोसायटींमधील नागरिक उपस्थित होते.
पुणे-पिंपरी-चिंचवड आणि मावळ परिसरात गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे शहर आणि उपनगरांमधील सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले. रुपीनगर- तळवडे भागात वीज, पाणीपुरवठा आणि विविध विकासकामे ठप्प झाली. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना नाहक मन:स्ताप सहन करावा लागला. मात्र, पावसाने काहीशी उघडीप दिल्यानंतर आमदार महेश लांडगे यांच्या माध्यमातून विविध विकासकामे सुरू करण्यात आली आहेत.
***
… ही विकासकामे लागली मार्गी!
रुपीनगर- तळवडे भागातील आयकॉन हॉस्पिटल रस्ता, टॉवर लाईन येथील कमलेश भालेकर व सुनील भालेकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता, त्रिवेणीनगर येथील अशोक भालेकर व बापु भालेकर यांच्या घराकडे जाणारा रस्ता, एस.के. बापु यांच्या घराशेजारील रस्ता, ज्योतिबानगरहून सोनवणेवस्तीकडे जाणारा रस्ता, तळवडे गाव येथील पंकज आवटे यांच्या घराकडे जाणारा रस्ता, सप्तश्रृंगी सोसायटीतील गणेश मंदिर, गजानन सोसायटीतील गणेश मंदिर, जलमय श्रीराम कॉलनीतील सी.डी. वर्क, नाला रुंदीकरण, स्ट्रॉम वॉटर लाईन, निसर्ग सोसायटीमधील साई मंदिर, संगम सोसायटीतील सभामंडप, श्रमसाफल्य सोसायटी व द्वारका सोसायटीमधील साई मंदिर, विजयानंद सोसायटीतील नागरिकांसाठी ‘ट्रेकिंग पार्क’, इंद्रायणी सोसायटीतील साई मंदिर सभामंडप, दक्षता गणपती मंदिराचा जीर्णोद्धार आदी कामांना गती देण्यात आली आहे.
***
प्रतिक्रिया :
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतीत रुपीनगर-तळवडे गावचा समावेश १९९७ मध्ये झाला. मात्र, समाविष्ट गावांना विकासापासून वंचित रहावे लागले आहे. नैसर्गिक आपत्तीच्या काळात नागरिकांच्या घरात पाणी शिरले. रस्ते, वीज, पाणीपुरवठा अशा पायाभूत सोयी-सुविधा सक्षम करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने स्थानिक नागरिकांच्या मागणीनुसार आम्ही विविध कामे हाती घेतली आहेत. पावसाने उघडीप दिल्यास सदर कामे तात्काळ मार्गी लावण्याबाबत महानगरपलिका, महावितरण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत.
* महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.