शबनम न्युज : प्रतिनिधी
पिंपरी ; राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी भोसरी येथील कनिष्ठ महाविद्यालयातील कु. किरण निगोजी अपकरी (11वी कला ) या विद्यार्थी खेळाडूने दि. 26 ते 31 जुलै 2024 कालावधीत के.पी.आर इन्स्टिट्यूट ऑफ इंजीनियरिंग टेक्नॉलॉजी, तामिळनाडू येथे झालेल्या भारतीय वुशू असोसिएशन व तामिळनाडू वुशू असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 23व्या ज्युनिअर युथ राष्ट्रीय वुशू अजिंक्यपद स्पर्धा 2024 मध्ये 17 वर्षाखालील ज्युनियर मुलांच्या गटात महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना 45 किलोग्रॅम वजन गटात रौप्य पदक प्राप्त केले आहे. या खेळाडूस कनिष्ठ महाविद्यालयाचे शारीरिक शिक्षण संचालक प्रा. गोपीचंद करंडे यांनी विशेष मार्गदर्शन केले.
या खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थेचे अध्यक्ष व भोसरी चे प्रथम आमदार मा.श्री. विलासराव लांडे साहेब यांनी विशेष अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच संस्थेचे खजिनदार व पिं.चिं. मनपाचे कार्यक्षम नगरसेवक मा. श्री अजित भाऊ गव्हाणे, संस्थेचे सचिव मा. सुधीर मुंगसे सर, विश्वस्त व नगरसेवक विक्रांतदादा लांडे सर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानडे के.जी , उपप्राचार्य प्रा.किरण चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ.नेहा बोरसे, विभाग प्रमुख प्रा. राजू हजारे, प्रा.योगिता बारवकर, प्रा. संगिता गवस व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.
Advertisement