शबनम न्यूज , प्रतिनिधी :
-झाकिर खानच्या टेलिव्हिजनवरील पदर्पणाच्या या नर्म विनोदी शो मध्ये त्याच्यासोबत असतील श्वेता तिवारी, ऋत्विक धनजानी, परेश गणात्रा आणि गोपाल दत्त
-10 ऑगस्ट रोजी सुरू होत असलेला ‘आपका अपना झाकिर’ हा शो दर शनिवारी-रविवारी रात्री 9:30 वाजता प्रसारित करण्यात येणार आहे
मुंबई- भारताच्या हृदयस्थानातून येऊन लक्षावधी लोकांच्या थेट हृदयात स्थान मिळवणारा, अत्यंत लोकप्रिय
कॉमेडीयन, कवी, अभिनेता, लेखक आणि निर्माता झाकिर खान सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील
‘आपका अपना झाकिर’ या शोमध्ये होस्ट या नात्याने टेलिव्हिजनवर पदार्पण करत आहे. टॉक शोचा
अनुभव अधिक रंजक करत, हा हलका-फुलका शो दैनंदिन अनुभवांचे विनोदी ढंगाने सादरीकरण करून
‘खुशियों की गॅरंटी’ आणि ‘मनोरंजन का वादा’ करत आहे. प्रत्येक एपिसोडमध्ये खास झाकिर शैलीचे
स्टोरीटेलिंग असेल आणि सेलिब्रिटीजच्या मुलाखती, प्रेक्षकांशी संवाद आणि स्टँड-अपसारखे सेगमेन्ट
असतील. जीवनातील चढ-उतारांकडे बघण्याच्या त्याच्या अनोख्या दृष्टीकोनामुळे त्याने सांगितलेल्या
प्रापंचिक गोष्टी देखील लक्षणीयरित्या विनोदी वाटू लागतील. हे कथाकथन करताना सल्ला आणि
सहानुभूती यांचे समप्रमाण राखणे हे त्याचे कसब आहे. भारताचा हा ‘सख्त लौंडा’ तुम्हाला हास्य-विनोद
आणि खऱ्याखुऱ्या गोष्टींच्या सफरीवर घेऊन जाणार आहे. त्याच्या विशेष दृष्टीकोनामुळे तो सर्वांना
खरोखरच ‘आपका अपना’ वाटला, तर त्यात काहीच नवल नाही. ओन्ली मच लाऊडर आणि सख्त
फिल्म्सद्वारा निर्मित, को-प्रेझेंटेड बाय वॉक्सवॅगन इंडिया आणि को-पावर्ड बाय स्मिथ अँड जोन्स जिंजर
गार्लिक पेस्ट, ‘आपका अपना झाकिर’ हा शो सुरू होत आहे 10 ऑगस्ट रोजी आणि दर शनिवारी-रविवारी
रात्री 9:30 वाजता तो प्रसारित करण्यात येणार आहे, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून.
झाकिर खान केवळ एक विनोदवीर नाही. तो कथाकथन करणारा, निर्माता, लेखक, कवी आणि एक
सांस्कृतिक कलाकार आहे. त्याच्या या प्रवासात त्याच्यासोबत इतर सुपरिचित चेहरे दिसणार आहेत, जे या
शोमध्ये आपली आगळी छटा घेऊन येतील. गोपाल दत्त या शोमध्ये झाकीरचा जुना मित्र म्हणून दिसेल.
जो त्याच्या सोबतच राहतो. त्याचे लवकरात लवकर लग्न व्हावे अशी झाकिरची इच्छा आहे. प्रसिद्ध
टेलिव्हिजन अभिनेत्री श्वेता तिवारी झाकिरची शेजारीण आहे. ऋत्विक धनजानी हा झाकिरचा क्रिकेट
खेळातला दोस्त आहे, जो या शो मध्ये त्याची सदाबहार ऊर्जा आणि डान्सच्या मूव्ह्ज घेऊन येईल. आणि
सगळ्यात शेवटी म्हणजे, परेश गणात्रा या शोमध्ये पैसा आणि खाणे याबाबतचे आपले वेड दाखवेल.
आपल्या गुंतवणुकींच्या भन्नाट योजना सांगून तो झाकिरला सतत हैराण करत असतो. ही सगळी अतरंगी
पात्रे मिळून तुमचे यथेच्छ मनोरंजन करतील आणि तुम्हाला भरपेट हसवतील.
हास्य आणि जीवनाचा बोधपाठ देणारा नर्म विनोद हे सारे काही आहे ‘आपका अपना झाकिर’ मध्ये!
बघा नवीन शो, ‘आपका अपना झाकिर’ 10 ऑगस्टपासून दर शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर.