पिंपरी- चिंचवडमध्ये पुन्हा एकदा हिट अॅण्ड रन प्रकरण झाल्याचं समोर आलं आहे. घटनेचा सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ७ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या सुमारास अपघात झाला. तक्रार दाखल नसल्याने ताब्यात घेतलेल्या कार चालकाला सांगवी पोलिसांनी सोडून दिले. घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कार चालकाचा शोध पोलीस घेत आहेत.
पिंपरी-चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात सात ऑगस्ट रोजी दुपारी बाराच्या सुमारास भरधाव चारचाकी आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाला. चारचाकी चालकाने दुचाकीसह चालकाला काही फूट अंतरावर फरफट घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. या घटनेत दुचाकी चालकासह इतर एक जण जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Advertisement