पिंपरी, ता. ९ – भारताच्या स्वातंत्राच्या इतिहासात ९ ऑगस्ट या दिनास असाधारण महत्व असल्याने सर्व भारतीयांसाठी हा अभिमानाचा दिवस आहे.शहीद भगतसिंग व सुखदेव यांचे स्मारक दापोडी या ठिकाणी आहे.यानिमित्ताने दापोडी येथे राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे कार्याध्यक्ष देवेंद्र तायडे यांनी अभिवादन केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी विभाग शहराध्यक्ष भाई विशाल जाधव, ख्रिश्चन सेना अध्यक्ष शौल कांबळे, भोसरी विधानसभा उपाध्यक्ष अजय पिल्ले,पिंपरी चिंचवड शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्षा सायली किरण नढे , महाराष्ट्र प्रदेश एन एस यु आयचे उपाध्यक्ष ॲड उमेश खंदारे, युवक अध्यक्ष कौस्तुभ नवले , झेवियर अँथनी, रोहित शेळके, किरण नढे, जय ठोंबरे, सोनाली खंधारे, रोहित जाधव, विवेक विधाते, उमेश तांबोळी आदी सामाजिक कार्यकर्ते विशाल कांबळे आदी उपस्थित होते.
देवेंद्र तायडे म्हणाले कि, भारतावर इंग्रजांचे राज्य होते आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी भारत मातेच्या अनेक सुपूत्रांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला मुक्त करण्यासाठी ज्यांनी प्राणांचे बलिदान दिले त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे 9 ऑगस्ट असे प्रतिपादन देवेंद्र तायडे यांनी केले .