शबनम न्युज | बारामती
बारामतीत व्याज वसुलीसाठी एकाचे अपहरण करून त्यास मारहाण करण्यात आल्याचे प्रकार समोर आला आहे. 50 हजार रुपये आठवड्याला 10 म्हणजेच प्रति महिना जवळपास 40% व्याजाने दिल्यानंतर तीस हजार रुपये केवळ व्याजापोटी घेतले. मात्र, त्यानंतर देखील सव्वा दोन लाखांची मागणी करीत कार जबरदस्तीने ओढून नेण्यात आली. शिवाय व्याज देत नाहीत म्हणून एकाचे अपहरण करत त्याला तांदूळवाडीच्या ओढ्यात दाबून ठेवल्याची तक्रार शहर पोलिसात करण्यात आली. त्यानुसार, या प्रकरणी शहर पोलिसांनी तिघांविरोधात अपहरणासह मारहाण व सावकारी अधिनियमासह अन्य कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी स्वाती सुरेश नन्नवरे (रा. हरिकृपा नगर, बारामती) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्यानुसार सागर गवळी (रा. बारामती) विकास माने (रा. बारामती) व विक्रम थोरात (रा. एमआयडीसी, बारामती) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पती सुरेश नन्नवरे यांनी 22 मार्च रोजी 50 हजार रुपये आठवडा दहा टक्के व्याजाने घेतले होते. त्या पोटी तीस हजार रुपये व्याज दिले होते. तरीही आणखी दोन लाख 25 हजार रुपयांची मागणी केली जात होती. त्या पोटी सातत्याने त्रास दिला जात होता. आरोपींनी व्याजापोटी ननवरे यांच्याकडील कार जबरदस्तीने नेली. शिवाय व्याज देत नसल्याच्या कारणावरून 20 मे रोजी सुरेश ननवरे यांचे अपहरण करून तांदुळवाडीतील म्हसोबा मंदिराजवळील ओढ्यात त्यांना गुप्तपणे बांधून ठेवण्यात आले. अखेर सावकारांचा त्रास असह्य झाल्याने या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली. याबाबत अधिक तपास बारामती पोलीस करीत आहेत.