पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटी (डीईएस) च्या फर्ग्युसन कॉलेज (स्वायत्त) द्वारे “फॅशन फिएस्टा २४” या फॅशन शोचे महाविद्यालयातील एम्फि थिएटर येथे मोठ्या दिमाखात आयोजन केले होते. कॉलेजमधील बी-व्होक (फॅशन टेक्नॉलॉजी), डिप्लोमा, बुटीक मॅनेजमेंट आणि प्रमाणपत्र शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी डिझाइन केलेले पोशाख या फॅशन शोमध्ये दाखवण्यात आले. या फॅशन शोसाठी महाविद्यालयचे प्रभारी प्राचार्य डॉ. विजय तडके, प्रा. लीला तपाडिया, वैशाली भागवत, चंद्रप्रभा पाटील आणि श्रद्धा कानेटकर यांचे मार्गदर्शन लाभले. तर या महाविद्यालयाच्या उपप्राचार्या स्वाती जोगळेकर, नरेंद्र टेमघरे आणि मिलींद कांबळे यांनी मुलांचा उत्साह वाढवला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक आदित्य अगरवाल, संतोष फाड, के.के तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. तपाडिया म्हणाल्या की ‘महाविद्यालयातील फॅशन डिझायनिंग शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी “फॅशन फिएस्टा २४ शोचे आयोजन केले आहे आणि याचा वापर योग्य प्रकारे मार्केटींग टूल म्हणून केला जाऊ शकतो. गेल्या ३ दशकांहून अधिक काळ डेक्कन एज्युकेश सासायटी मध्ये फॅशन डिझानिंग शिकवले जात आहे; तर गेल्या 3 वर्षे फर्ग्युसन महाविद्यालयात पदवीचा अभ्यासक्रम चालू आहे. या क्षेत्रात स्त्रियांचा वाढता सहभाग महत्वपूर्ण आहे. फॅशन क्षेत्रात स्त्रियांनी स्वतःचे व्यासपीठ तयार केले आहे.
स्वतःच्या पायावर अनेक स्त्रिया उभ्या राहिल्या आहेत.’ या शोचे वैशिष्ठ ‘इको अलायन्स’ थीम, ज्यात सागरी प्रदूषण हटवून मिळवलेल्या पीईटी प्लास्टिक बाटल्यांपासून तयार केलेले कपडे होते, ‘अर्बन चीक’ एक अँड्रोजिनस थीम, ‘टाइमलेस क्राफ्ट लेगसी’ ज्यात इंडो-वेस्टर्न पोशाख डाबू ब्लॉक प्रिंट्समध्ये इंडिगो रंगात होते, ‘ड्युअल हार्मनी’ ज्यात विस्कोस रेयॉन प्रिंट्स आणि सिक्विन्सचे उत्कृष्ट मिश्रण होते, ‘आयव्हरी ड्रीम्स’ ज्यात ऑफ-व्हाइट, सेन्सुअस, फ्लुइड ड्रेस होते, तर ‘सेलेस्टियल ग्रेस’ मधील रॉयल गाऊन्स श्रावण क्वीनसाठी विद्यार्थ्यांनी तयार केले होते. याशिवाय, माजी विद्यार्थिनी प्रतिभा राचकर कुट्यूर रॉयल कलेक्शनमध्ये गाऊन्स, साड्या, घाघरा चोली, शेरवानी, आणि ५ वर्षांच्या मुलींसाठी ड्रेस सादर केले होते.
फॅशन “फिएस्टा २४ या फॅशन शोमध्ये भारतातीय व पाश्चात्य पध्दतीचे डिझाईन महाविद्यालयातील फॅशन डिझायनिंग शिकणाऱ्याच विद्यार्थ्यांनी केलेले कपडे यावेळी स्पर्धकांनी परिधान केले होते. या स्पर्धेत ७० हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. परीक्षक म्हणून डॉ. विजेता भटोरे , डॉ. रीना पांडे, सिध्दी मापसेंकर, चंद्रकला सानप आणि तृप्ती गुप्ता, होते. कार्यक्रमाला विशेष सहकार्य विष्णू बलदवा, गरिमा नाहर, ॲड. मनोज वाड यांचे लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रिया शिंगवी, अनन्या कदम, आर्यन सत्यप्रकाश अगरवाल यांनी केले.