कुस्ती आखाड्याला दिला 10 लाखांचा निधी
शबनम न्युज | पुणे
शिरूर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी महाळुंगे पडवळ गावच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित जंगी कुस्ती आखाड्याला भेट दिली. तसेच महाराष्ट्राचा रांगडा खेळ असलेल्या कुस्त्यांचा आनंद देखील घेतला. याप्रसंगी त्यांनी कुस्ती आखाड्याला दहा लाखांचा निधी उपलब्ध करून दिला.
Advertisement
आंबेगाव तालुक्यातील विविध भागातून व पंचक्रोशीतून मोठ्या संख्येने कुस्तीप्रेमी या आखाड्यात उपस्थित होते. या कुस्ती आखाड्याच्या कामासाठी दहा लाख रुपये निधी उपलब्ध करून देण्याचे शिवाजी आढळराव पाटील यांनी मागील वर्षी दिलेले आश्वासन पूर्ण करून ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळला तसेच महाळुंगे पडवळ येथील उदर मळा रस्ता सुधारणा करणे, या कामासाठी 25 लाख रुपये आणि इतर काही महत्त्वाच्या कामासाठी निधी उपलब्ध करून दिला.
Advertisement