शबनम न्युज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्षाकडून येणाऱ्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीसाठी ‘पक्ष उमेदवारी अर्ज’ मागवण्यात आले होते. सदर अर्ज पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे उपलब्ध होते. पिंपरी विधानसभेसाठी इच्छुक असलेले इंजि. देवेंद्र तायडे यांनी ‘पक्ष उमेदवारी अर्ज’ पक्षाच्या पिंपरी मध्यवर्ती कार्यालय येथे जमा केला.
हा अर्ज त्यांनी शहर सरचिटणीस जयंत शिंदे यांना सुपूर्द केला. यावेळी वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, सचिव कमलेश वाळके आणि कार्यालयीन सहाय्यक अविनाश कांबळे उपस्तिथ होते.
Advertisement