शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी : स्वरपंचम म्युझिक अकॅडमी ” च्या काळेवाडी व पिंपळे सौदागर शाखेच्या सर्व विद्यार्थी वर्गाच्या वतीने गुरुवर्य पंडित सुधाकर चव्हाण आणि गुरुवर्य पंडित रघुनाथ खंडाळकर यांचा गुरुपूजन सोहळा ग . दि . माडगुळकर सभागृह , निगडी , प्राधिकरण . या ठिकाणी आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पुजन व दीप प्रजनन करून झाले . पतियाळा घराण्याचे जेष्ठ गायक पंडित किरण परळीकर , ज्येष्ठ साहित्यिक राजेंद्र घावटे साहेब , स्वरपंचम म्युझिक अकॅडमीचे संस्थापक संचालक चंद्रकांत वाघचौरे ,संचालक अभयसिंह वाघाचौरे , तसेच तानाजी पाटील , बाळासाहेब वाडेकर , आण्णा गुरव , तबलावादक कार्तिक स्वामी व इतर मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पुजन व दीप प्रज्वलन करण्यात आले .
त्यानंतर अकॅडमीच्या सर्व विद्यार्थ्यांचे अप्रतिम गायन वादन सादरीकरण झाले . विद्यार्थ्यांच्या गायन वादनानंतर पं . सुधाकर चव्हाण यांचे शिष्य अभयसिंह वाघाचौरे यांचे शास्त्रीय गायन झाले . त्यांनी “शुद्ध सारंग ” राग अतिशय तयारीने सादर केला . त्यानंतर ठुमरी व “ओम नमो भगवते वासुदेवाय ” ही रचना अतिशय भावपूर्ण सादर करून आपले समारोप गायन संपविले . कार्तिक स्वामी (तबला ) , हरिभाऊ आसतकर (संवादिनी) , चौरंगनाथ खांडेकर ( पखवाज) , नरेंद्र काळे (तालवाद्य) , यांनी त्यांना उत्कृष्ट साथसंगत केली . विद्यार्थी , पालक , गुरुजन व रसिक यांनी गायनाला उत्कटपणे दाद दिली . त्यानंतर गुरुवर्य पंडित सुधाकर चव्हाण यांचे गुरु पुजन करण्यात आले . पंडित किरण परळीकर सर , पंडित प्रभाकर पांडव , ह भ प लक्ष्मणबुवा पवार यांचा सन्मान करण्यात आला . त्या प्रसंगी गुरुजी पं .सुधाकर चव्हाण व पं . किरण परळीकर यांनी सर्वांना मार्गदर्शन केले . गुरुपूजन सोहळा थाटामाटात संपन्न झाला .